यूपीएससी साठी एक अटेम्प्ट वाढवून द्यायला सरकार तयार
 

कोरोना महामारिमुळे २०२० चा UPSC परीक्षेचा attempt देणे अनेक उमेदवारांना अवघड गेले. त्यामुळे ज्यांची ही शेवटची संधी होती त्यांना अतिरिक्त संधी मिळावी ह्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाली होती.

 

ह्या याचिकेच्या आजच्या सुनावणीत केंद्र सरकार आणि केंद्रीय लोकसेवा आयोग ह्यांनी उमेदवारांना एक वाढीव संधी द्यायची आपली तयारी असल्याचे कोर्टाला सांगितले. परंतु  ही वाढीव संधी काही अटींसह देण्यात येईल.

 
काय आहेत ह्या अटी?
 
२०२० च्या ऑक्टोबर महिन्यात ज्या उमेदवारांनी शेवटचा attempt म्हणून परीक्षा दिली, त्यांनाच ही वाढीव संधी मिळेल.
ही वाढीव संधी २०२१ च्या परीक्षेपुरतीच मर्यादित असेल. म्हणजेच वाढीव संधीचा फायदा ह्या नंतर होणाऱ्या परीक्षांसाठी मागता येणार नाही.
ज्या उमेदवारांनी UPSC ने ठरवून दिलेली वयोमर्यादा ओलांडली नसेल त्यांनाच वाढीव संधीचा फायदा घेत येईल. वयोमर्यादा बदलली जाणार नाही किंवा त्यात सूट मिळणार नाही.
ही सूट भविष्यात नियम म्हणून बघितली जाऊ नये. ही केवळ आत्ताची परिस्थिती बघता देण्यात अली आहे.
 

याविषयीची अधिकृत लिखित note कोर्टाने additional solicitor general ह्यांच्याकडून मागितली आहे. ह्या विषयावर पुढील सुनावणी ८ फेब्रुवारी ला होईल.

 

केंद्राने मागील सुनावणीत वाढीव संधी द्यायची आपली तयारी नाही असे सांगितले होते

परंतु उमेदवारांची विनंती ऐकून केंद्राने आपली भूमिका बदलली असावी असे दिसते. अंतिम निकाल आल्याशिवाय नेमकी वाढीव संधी मिळणार की नाही ह्याविषयी स्पष्टता होणार नाही. तूर्तास, UPSC देऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी पुन्हा एकदा आशेचे किरण ह्या भूमिकेने आणले आहे.

One thought on “यूपीएससी साठी एक अटेम्प्ट वाढवून द्यायला सरकार तयार

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!