ब्रिटन कडून चायनीज वृत्त वाहिनीचा परवाना रद्द
 

ब्रिटन च्या ऑफिस ऑफ कम्युनिकेशन ह्या माध्यम नियामक संस्थेने चीन च्या CGTN ( China Global Television Network) ह्या वृत्त वाहिनीचा परवाना रद्द केला आहे. ह्यामुळे आता CGTN ची ब्रिटन मधून हकालपट्टी झाली आहे.

 

ब्रिटन च्या प्रसारण कायद्यानुसार वृत्त वाहिनी चालवण्यासाठी ज्या कंपनी ला परवाना दिला जातो त्या company चे ह्या वाहिनीवर नियंत्रण असणे आवश्यक आहे. परंतु CGTN ही वाहिनी चालवण्यासाठी ज्या company ला परवाना देण्यात आला होता ती Star China Media Limited ही कंपनी प्रत्यक्ष कुठलेही निर्णय घेत नाही आणि तिचा CGTN च्या संपादकीय निर्णयाशी संबंध नाही हे Ofcom ( office of communication) च्या लक्षात आले. त्यामुळे हा परवाना रद्द करण्यात आला. ह्या वाहिनीवर चीन च्या कम्मुनिस्ट पक्षाचेच नियंत्रण असल्याचे लक्षात आल्यावर हा निर्णय घेण्यात आला.

 

ह्यापूर्वी ह्या वाहिनीवर नियमांचा भंग केल्याचे ठपके ठेवले गेले होते. एका ब्रिटीश नागरिकाच्या चीन सरकारने जबरदस्तीने करवून घेतलेल्या कबुली जबाबाचा व्हिडिओ ह्या वाहिनीने त्याची परवानगी न घेता दाखवला होता. हाँग काँग मधील आंदोलनावर चीन ची उघड बाजू घेणारे वृत्तांकन CGTN ने केले होते. पुन्हा पुन्हा संधी देऊनही ह्या वाहिनीने कायद्यांचा भंग केल्याचे सांगत अखेर ही कारवाई करण्यात आली आहे.

 

ह्या कारवाई चे उत्तर म्हणून आता चीन ने बीबीसी ह्या ब्रिटीश वृत्त संस्थेविरोधत तक्रारी केल्या आहेत. कोरोना वरील वृत्तांकन आणि उघ्युर मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचारांच्या वृत्तांकन ह्याबद्दल BBC ने माफी मागावी अशी मागणी आता चीन कडून करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!