मराठा आरक्षण: सुप्रीम कोर्टात ८ मार्च पासून सुनावणी
 

आज महाराष्ट्र राज्याने दिलेल्या मराठा अरक्षणाविरुद्ध याचिकांवर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. ह्या प्रकरणात सविस्तर सुनावणी अजून सुरू झालेली नाही. Covid मुळे दोन्ही पक्षांनी प्रत्यक्ष कोर्ट सुरू होईपर्यंत सुनावणी पुढे ढकलावी अशी मागणी केली होती.

 

आज सुप्रीम कोर्टाने ह्या प्रकरणाची सविस्तर सुनावणी ८ मार्च पासून सुरू होईल असे आदेश दिले. आधी याचिकाकर्ते आपली बाजू मांडतील. नंतर राज्य सरकारला बाजू मांडण्यासाठी वेळ देण्यात येईल. काही संबंधित याचिका आणि अर्ज ही ऐकण्यात येतील आणि सर्वात शेवटी केंद्र सरकार आपली बाजू मांडेल. ८ मार्च ते १८ मार्च ह्या कालावधीत ही सुनावणी पूर्ण करण्याचा कोर्टाचा इरादा आहे.

 

ह्या प्रकरणात बरीच कागदपत्रे आणि दस्तावेज असल्याने virtual सुनावणी मध्ये युक्तिवाद करणे सर्व बाजूच्या वकिलांना अवघड वाटत होते. परंतु आता ८ मार्च का जरी प्रत्यक्ष कोर्ट सुरू झाले नसेल तरी ही सुनावणी virtual माध्यमाने घेतली जाणार आहे.

 

कोणत्याही राज्यात ५०% पेक्षा जास्त आरक्षण असू नये असे म्हणणारा इंदिरा साहनी केस चा ९ न्यायाधीशांच्या खंडपीठाने दिलेला निकाल हा ह्या युक्तिवादाचा केंद्रबिंदू असणार आहे. प्रस्तुत खंडपीठ ५ न्यायाधीशांच्या असल्याने ते इंदिरा साहनी निकालाला बांधील असणार आहे. त्यांना ह्या निकालाच्या विरुद्ध जाता येणार नाही. त्यामुळेच इंदिरा साहनी निकालाच्या चौकटीत महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला दिलेले आरक्षण कसे बसवायचे हे राज्याच्या वकिलांना आव्हान असणार आहे.

 

ह्या प्रकरणात कपिल सिब्बल, मुकुल रोहतगी, श्याम दिवाण, अरविंद दातार आणि Attorney General वेणुगोपाल असे मातब्बर वकील युक्तिवाद करतील.

   

One thought on “मराठा आरक्षण: सुप्रीम कोर्टात ८ मार्च पासून सुनावणी

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!