पॉक्सो स्किन-टू-स्किन निकाल: महिला आयोग सुप्रीम कोर्टात
 

 मुंबई उच्च न्यायालयाच्या न्या. पुष्पा गनेडिवाला ह्यांच्या पॉक्सो कायद्यावरील विवादित निकालाविरोधात राष्ट्रीय महिला आयोगाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

 

१९ जानेवारी रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अल्पवयीन मुलीचे कपडे न काढता तिच्या छातीला स्पर्श करणे हे कृत्य POCSO कायद्यातील लैंगिक अत्याचाराच्या व्याख्येत बसत नाही, असा निकाल दिला होता. हे कृत्य केवळ IPC खालील विनयभंगाच्या गुन्ह्यात मोडते असे म्हणत न्यायालयाने दोषी व्यक्तीला POCSO खालील आरोपातून मुक्त केले होते.

 

ह्या निकालाला सुप्रीम कोर्टाने २७ जानेवारी रोजी स्थगिती दिली होती. ह्या निकालामुळे न्या. गनेडिवाला ह्यांनी स्थायी न्यायाधीश पदी नियुक्त करण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाच्या collegium कडून मागे घेण्यात आला होता

 

ह्या निकालाला विविध संघटनांकडून सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले आहे. आता राष्ट्रीय महिला आयोग सुद्धा याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयाकडे याचिका घेऊन आल्याचे समजते आहे. मुंबई उच्च न्यायालयाने POCSO कायद्यातील तरतुदींचा लावलेला अर्थ अत्यंत चुकीचा असल्याचे महिला आयोगाने आपल्या याचिकेत म्हंटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!