भारतविरोधी टूलकिट तयार करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल
 

ग्रेटा थनबर्ग ने चुकून शेअर केलेल्या एका टूलकिट मधून भारतविरोधी आंतरराष्ट्रीय कट उघडकीला आला. ह्या कटामागे हात असलेल्या लोकांविरुद्ध आणि ह टूलकिट तयार करणाऱ्यांविरुद्ध दिल्ली पोलिसांनी FIR दाखल केल्याची बातमी Law Marathi ने दिली होती

 

ह्या FIR विषयी आणखी माहिती आता समोर आली आहे. ह्या FIR मध्ये १२४A हे कलम देखील असल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले आहे. १२४ A ह्या कलमात देशद्रोहाच्या गुन्ह्याची तरतूद आहे.

देशद्रोह, विविध  धार्मिक, सांस्कृतिक गटांमध्ये विद्वेष निर्माण करून देशाचे वातावरण बिघडवणे आणि गुन्हेगारी कारस्थान रचणे असे गुन्हे ह्या टूलकिट कर्त्यांविरोधत नोंदवले गेले आहेत. ह्या सगळ्या प्रकाराची चौकशी करत असल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले आहे. तसेच FIR मध्ये Greta किँवा अन्य कोणाचेही नावं नसल्याचे दिल्ली पोलिसांनी स्पष्ट केले.

 

कृषी कायदे विरोधी आंदोलनात परदेशी सेलिब्रिटी रिहाना, शालेय पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा ह्यांनी उडी घेतल्याने हा सगळा प्रकार उघडकीला आला होता. भारत सरकारने हे प्रकरण चांगलेच गांभीर्याने घेतल्याचे ह्या आधीच दिसले होते

One thought on “भारतविरोधी टूलकिट तयार करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!