पोलिसांच्या डोळ्यादेखत वटवृक्ष तोडला: तक्रार दाखल
 

मुंबईच्या प्रसिद्ध गिरगाव चौपाटी येथे जुना डेरेदार वटवृक्ष पोलिसांच्या डोळ्यादेखत अवैधरित्या तोडण्यात आल्याचा प्रकार काल घडला.

 

मध्यरात्री काही लोक येऊन हे वादाचे झाड तोडू लागले. पोलिसांच्या देखरेखीत हे झाड तोडले गेले. कोणताही परवाना न घेता, महापालिकेकडून परवानगी न घेता हे झाड तोडण्यात आले.

 

नागरिकांनी BMC ला ट्विटर वरून ह्या प्रकाराबद्दल जागे केले.

   

हा प्रकार जाहिरातींची होर्डिंग्ज स्पष्ट दिसतो ह्यासाठी करण्यात आला असावा असा परिसरातील रहिवाशांचा अंदाज आहे. ह्या प्रकारामुळे परिसरातील रहिवासी आणि सर्वच मुंबईकर संतप्त आहेत आणि हळहळ व्यक्त करत आहेत.

 

BMC ने आपण ह्या वृक्षतोडीची तक्रार गावदेवी पोलिस ठाण्यात दाखल केल्याची माहिती दिली.

     

ही तक्रार महाराष्ट्र वृक्ष संवर्धन कायदा, १९७१ च्या कलम ८ आणि २१ खाली दाखल करण्यात आली आहे.

 

पोलिसांच्या उपस्थितीत हे अनधिकृत कृत्य झाल्याने पोलिसांविरुद्ध देखील तक्रार दाखल करावी असे स्थानिकांचे आणि पर्यावरण प्रेमींचे म्हणणे आहे.

 

आदित्य ठाकरे ह्यांनी ह्यावर प्रतिक्रिया देताना आपण संबंधित पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा केली असून ह्यावर कडक कारवाई होईल असे आश्वासन दिले आहे.

   

शहरातील झाडे अशाप्रकारे तोडली जात असताना महापालिका काय करते आहे असा प्रश्न नागरिक विचारात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!