शेतकरी आंदोलनाला कोणत्याही देशाचा पाठिंबा नाही: केंद्र
 

 भारतातील शेतकऱ्यांच्या कृषी कायदे विरोधी आंदोलनाला कोणत्याही परदेशी सरकारने समर्थन दिलेले नाही अशी माहिती केंद्र सरकारने आज संसदेला दिली.

 

लोक सभेत MIM पक्षाचे खासदार इम्तियाज जलील आणि असदुद्दीन ओवेसी ह्यांनी सरकारला प्रश्न विचारला होता. कृषी कायदे विरोधी आंदोलनांना कोणत्या देशांकडून पाठिंबा देण्यात आला आहे? कोणत्या राष्ट्रप्रमुखांनी ह्याविषयी पाठिंबा देणारी वक्तव्ये केली असे त्यांनी सरकारला विचारले.

 

ह्या प्रश्नाचे उत्तर देताना परराष्ट्र मंत्रालयाने कोणत्याही परदेशी सरकारने ह्या आंदोलनांना अधिकृत पाठिंबा दिला नसल्याचे स्पष्ट केली.

 

कॅनडा चे पंतप्रधान जस्टीन ट्रूडो ह्यांनी ह्याविषयी काही वक्तव्ये केली होती. भारताच्या अंतर्गत प्रश्नांमध्ये अशी वक्तव्ये करणे अनुचित आणि अस्विकार्य आहे हे भारत सरकारने कॅनडा सरकारला स्पष्ट केले.  भारत सरकार हा प्रश्न सोडवण्यासाठी करत असलेल्या प्रयत्नांची प्रशंसा कॅनडा सरकार कडून करण्यात आली आहे, अशी माहितीही केंद्राने आपल्या उत्तरात दिली आहे.

Lok sabha question on farmer protest  

सध्या संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे.  अधिवेशनात सरकारला संसदेत खासदारांकडून विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांची उत्तरे देणे बंधनकारक असते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!