मनी लाँडरींग केस: चंदा कोचर ह्यांना मुंबई कोर्टाचे समन्स
 

मुंबईतील विशेष सत्र न्यायालयाने ICICI बँकेच्या माजी कार्यकारी संचालक चंदा कोचर ह्यांना मनी लाँडरिंग प्रकरणात १२ फेब्रुवारी ला कोर्टात हजर राहण्याचा आदेश दिला आहे. चंदा कोचर ह्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून व्हिडिओकॉन कंपनीला अनधिकृत कर्ज दिल्याचे आणि त्या बदल्यात लाच घेतल्याचे निरीक्षण नोंदवले आहे.

 
काय आहे प्रकरण?

चंदा कोचर ह्या ICICI बँकेच्या माझी सीईओ आहेत. त्यांनी आपल्या कार्यकाळात व्हिडिओकॉन ग्रुप च्या कंपन्यांना ICICI कडून ३०० कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करवून  दिले. हे कर्ज नियमांचा भंग करून देण्यात आले होते.

 

व्हिडिओकॉन चे मालक वेणुगोपाल धूत ह्यांच्याशी चंदा कोचर आणि पती दीपक कोचर ह्यांचे जुने संबंध होते. हे कर्ज देताना कोचर ह्यांनी हे संबंध असल्याची बाब लपवली आणि कर्ज देण्याचा निर्णय घेण्यासाठी जी समिती बसते त्यातून त्यांनी स्वतःला वगळले नाही.

 

हे कर्ज मंजूर करवून दिल्याबद्दल त्यांनी धूत ह्यांच्याकडून ६४ कोटींची लाच स्वीकारली. ही रक्कम प्रत्यक्ष न घेता त्यांनी आपल्या पतीच्या NRPL ह्या company च्या माध्यमातून हे पैसे घेतले.

 

हा प्रकार उघड झाल्यावर ED ने कोचर यांच्याविरुद्ध कारवाई सुरू केली. त्यांना ICICI बँकेतून काढून टाकण्यात आले आणि पती दीपक कोचर ह्यांना ED ने अटक सुद्धा केली होती.

 

हे प्रकरण मुंबईच्या PMLA ( Prevention of Money Laundering Act) खालील विशेष सत्र न्यायालयात सुनावणी साठी आज आले असता प्रथमदर्शनी चंदा कोचर ह्यांनी हा गुन्हा केला असल्याचे दिसून येते असे कोर्टाने म्हंटले. चंदा आणि इतर सहकारी आरोपींना १२ फेब्रुवारी रोजी कोर्टापुढे हजार राहण्याचा आदेश देण्यात आला आहे. त्यांच्यावर PMLA च्या कलम ३ आणि ७० खाली गुन्हा नोंदवण्यात आलेला असून हा खटला पुढे चालवण्याची परवानगी कोर्टाने ED ला दिली आहे.

   

One thought on “मनी लाँडरींग केस: चंदा कोचर ह्यांना मुंबई कोर्टाचे समन्स

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!