कृषी कायद्यांवर सेलिब्रिटी टिवटिव: केंद्र सरकारने खडसावले
 

कृषी कायदे आणि त्याविरोधत होणारी आंदोलने ह्याबद्दल प्रतिक्रिया देण्यासाठी धावायच्या आधी जरा सत्य काय आहे ह्याची खात्री करून घ्या आणि हा प्रश्न नीट समजून घ्या. सेलिब्रिटी बोलतायत म्हणून सनसनाटी साठी सोशल मीडिया वर व्यक्त होणे अत्यंत बेजबाबदारपणाचे आहे.

अशा परखड भाषेत भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने कृषी कायद्यांबद्दल टिवटिव करणाऱ्या फॉरेनर सेलिब्रिटी आणि सामान्यांना खडसावले आहे.

काल अचानक Rihanna ह्या अमेरिकन पॉपस्टार ने भारतातल्या कृषी कायदे विरोधी आंदोलनाच्या समर्थनार्थ एक ट्विट केले.

   

ह्यानंतर अचानक इतरही काही फॉरेनर सेलिब्रिटी ह्या विषयावर ट्विट करू लागले.

पर्यावरणवादी म्हणून प्रसिद्ध असलेल्या ग्रेटा थेनबर्ग ह्या शालेय बलिकेनेही असेच एक ट्विट केले

   

हे सेलिब्रिटी अचानक भारताच्या अंतर्गत प्रश्नांमध्ये एवढा रस का घ्यायला लागले असा प्रश्न मग अनेकांनी सोशल मीडिया वर व्यक्त केला.

 

त्यानंतर आज भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक पत्र जाहीर करत #IndiaAgainstPropoganda आणि #IndiaTogether अशी भूमिका घेतली.

 

भारताच्या संसदेने चर्चा करून हे तीन कृषी कायदे शेतीत सुधारणा करण्यासाठी परित केले आहेत. ह्या कायद्यांना देशातील केवळ काही शेतकऱ्यांचा विरोध आहे. परंतु काही हितसंबंध असलेले लोक ह्या विरोधात आंदोलन करणाऱ्यांवर त्यांचा agenda थोपू पाहत आहेत. हे लोक आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताविरुद्ध वातावरण निर्माण करू पाहत आहेत. ह्या आंदोलकांनी २६ जानेवारी ला, भारताच्या प्रजासत्ताकदिनी राजधानी दिल्लीत हिंसाचार, नासधूस केली. परदेशात काही ठिकाणी महात्मा गांधींच्या पुतळ्याचा अवमान झाला. त्यामुळे हाय प्रश्नावर बोलताना आधी भारताच्या लोकशाहीचे स्पिरीट समजून घ्या. सत्य, तथ्य आणि प्रश्न नीट समजून न घेता सेलिब्रिटी आणि इतर कोणीही समाज माध्यमांवर व्यक्त होणे चूक आणि बेजबाबदारपणाचे आहे, असेही ह्या पत्रात म्हणण्यात आले आहे.

2 thoughts on “कृषी कायद्यांवर सेलिब्रिटी टिवटिव: केंद्र सरकारने खडसावले

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!