तंत्रशिक्षण संस्थांमध्ये असिस्टंट प्रोफेसर पदासाठी ५/३/२०१० पासून PhD आवश्यक असल्याचे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे.
AICTE ह्या तंत्रशिक्षण नियामक संस्थेने केलेल्या नियमांनुसार २०१० नंतर PhD नसलेल्या कोणालाही असिस्टंट प्रोफेसर होता येणार नाही.
-
प्रकरण काय?
AICTE ने केलेल्या नियमानुसार ५/३/२०१० नंतर तंत्रशिक्षण संस्थांमध्ये प्राचार्य, प्राध्यापक, सहायक प्राध्यापक ह्या पदांसाठी व्यक्तीने PhD असणे बंधनकारक झाले. केरळ राज्याने २००३ मध्ये तंत्रशिक्षण सेवा नियम जारी करत ह्या पदांवर PhD नसलेल्या व्यक्तींची नेमणूक करता येईल असे जाहीर केले परंतु अशा ७ वर्षांच्या आत PhD मिळविणे बंधनकारक केले. परंतु २०१० नंतर AICTE नुसार PhD नसलेले सर्व प्राध्यापक अपात्र ठरले. केरळ मधील अपात्र ठरलेल्या प्राध्यापकांनी केरळ हाय कोर्टात याचिका करून राज्याच्या नियमांनुसार आपल्याला PhD मिळवण्यासाठी ७ वर्षांची मुदत असल्याचे सांगितले. ह्यावर केरळ हाय कोर्टाने निकाल देत प्राध्यापकांचे म्हणणे फेटाळून लावले.
ह्या प्राध्यापकांच्या १२ याचिका सुप्रीम कोर्टात आल्या. त्यावर सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले की, केरळ शासनाच्या नियमांनी दिलेली ७ वर्षांची मुदत ही AICTE च्या ५/३/२०१० पर्यंतच लागू असेल. २०१० नंतर PhD नसलेली व्यक्ती प्राचार्य, प्राध्यापक, सहायक प्राध्यापक ह्या पदांसाठी अपात्र ठरविण्यात येईल.
त्यामुळे आता तंत्रशिक्षण संस्थांमध्ये सहायक प्राध्यापक आणि वरिष्ठ पदांसाठी अर्हता काय असावी ह्या प्रश्नावर स्पष्टता झाली आहे.