फेक न्यूज प्रकरणात आपल्याविरुद्ध देशात विविध ठिकाणी दाखल झालेल्या FIR रद्द व्हावा ह्यासाठी राजदीप सरदेसाई आणि शशी थरूर ह्यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे.
२६ जानेवारी रोजी दिल्लीतील कृषी कायदे विरोधी ट्रॅक्टर रॅली दरम्यान एका शेतकऱ्याचा पोलिसांनी गोळी मारल्यामुळे मृत्यू झाला अशी खोटी बातमी इंडिया टुडे चे पत्रकार राजदीप सरदेसाई ह्यांनी दिली होती. काँग्रेस पक्षाचे खासदार शशी थरूर ह्यांनीही सोशल मीडिया वरून ही खोटी बातमी पसरवली होती. नॅशनल हेरॉल्ड आणि The Caravan ह्या वृत्त संस्थांच्या पत्रकारांनीही ही खोटी बातमी पसरवत हिंसाचाराला खतपाणी घातले होते.
ह्यामुळे, देशातील नागरिक चांगलेच संतप्त झाले आणि त्यांनी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, दिल्ली मध्ये वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात ह्या फेक न्यूज पसरवणाऱ्या पत्रकार आणि नेत्यांविरोधत FIR दाखल केल्या. ह्याविषयी Law Marathi ने हा रिपोर्ट केला होता.
ह्या FIR विविध ठिकाणी झाल्याने सरदेसाई, थरूर आणि इतरांना विविध ठिकाणच्या पोलिस कारवाई ला सामोरे जावे लागेल. ह्यामुळेच ह्या कारवाई पासून संरक्षणासाठी ह्या आरोपींनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. एकाच गुन्ह्यासाठी अनेक वेळा कारवाई किंवा शिक्षा भोगावी lagu नये ह्यासाठी सुप्रीम कोर्टात अशी याचिका केली जाऊ शकते.
सुप्रीम कोर्ट ह्या आरोपींना संरक्षण देते की नाही हे आता लवकरच कळेल.
One thought on “फेक न्यूज प्रकरण: राजदीप, थरूर ह्यांची सुप्रीम कोर्टात धाव”