महाराष्ट्र सरकारने राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याला परवानगी दिली आहे.
कोरोना मुळे राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका मार्च २०२० च्या आदेशाने पुढे ढकलण्यात आल्या होत्या. जानेवारी २०२१ च्या आदेशाने ह्या निवडणुका ३१ मार्च पर्यंत आणखी पुढे ढकलण्यात आल्या होत्या. परंतु राज्य सरकारने आज जाहीर केलेल्या शासन निर्णयानुसार ह्या निवडणुका लगेच घेता येणार आहेत आणि त्यासाठीची प्रक्रिया त्वरित सुरू करण्याचे निर्देश सरकारकडून संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
ह्यामुळे आता राज्यातील सहकारी पतसंस्था, हाउसिंग सोसायट्या अशा सर्व संस्थांच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. परंतु तज्ज्ञांच्या मते २५० पेक्षा कमी सदस्य असलेल्या सहकारी संस्थांना निवडणुका घेता येणार नाहीत कारण त्यांच्या निवडणुकांसाठी नियम अजून सरकारकडून notify करण्यात आलेले नाहीत.