मंजुळा शेट्ये प्रकरण: आरोपी वसिमा शेख ला जामीन नाही
 

 मंजुळा शेट्ये हत्या प्रकरणातील एक आरोपी वसिमा शेख हिचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला आहे.

 

काय होते प्रकरण?

 

मंजुळा शेट्ये ह्या आजन्म कारावासाची शिक्षा झालेल्या एका महिला कैद्याचा जून २०१७ मध्ये भायखळा तुरुंगात मृत्यू झाला. हा मृत्यू तुरुंग अधिकाऱ्यांनी केलेल्या मारहाणीमुळे झाल्याचे समोर आले. ह्यात जेलर मनीषा पोखरकर आणि इतर पाच पोलिस कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ह्यापैकी एक आरोपी वसिमा शेख हिने जामीन मिळाव ह्यासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला होता.

 

आत्तापर्यंत झालेल्या साक्षीपुराव्यात आपल्याविरुद्ध काही ठोस आढळले नसल्याने तसेच कोरोना ची भीती असल्याने जामीन मिळावा अशी शेख हिच्या वतीने मागणी करण्यात आली. परंतु कोर्टाने हा अर्ज नामंजूर केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!