मुंबई हाय कोर्टाच्या न्या. दिपंकर दत्ता आणि न्या. जी. एस. कुलकर्णी ह्यांच्या खंडपीठाने वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचलनालयाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने ह्यांना दणका दिला आहे.
तात्याराव लहाने ह्यांनी जेजे हॉस्पिटल च्या गायनाकोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. अशोक आनंद ह्यांची थेट अंबाजोगाई येथील ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयात बदली केली.
कोरोना प्रतिबंधासाठी लागू साथरोग कायद्याचा वापर करत ही बदली करण्यात आली. आनंद ह्यांनी ह्या बदलील महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (MAT) येथे आव्हान दिले. MAT कडून ही बदली बेकायदेशीर असल्याचा निर्णय झाला. ह्या निर्णयाला राज्य सरकार आणि लहाने ह्यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले.
साथरोग कायद्याचा दुरुपयोग करत बदलीला लागू असलेल्या कायद्याकडे संपूर्ण कानाडोळा करून लहाने ह्यांनी हा निर्णय घेतल्याचे निरीक्षण हाय कोर्टाने नोंदवले. तसेच अशा उच्च पदावरच्या व्यक्तीची बदली ही मुख्यमंत्र्यांच्या सहमतिशिवाय कशी घेतली असा सवालही हाय कोर्टाने लहाने ह्यांना केला. लहाने ह्यांचा निर्णय बेकायदेशीर ठरवत कोर्टाने आनंद ह्यांची बदली रद्द केली आहे.