वेब सीरिज, ओटीटी प्लॅटफॉर्म वर निर्बंध आणणार: केंद्र
 

केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर ह्यांनी केंद्र सरकार OTT platforms वर लवकरच काही निर्बंध आणणार असल्याचे संकेत आज दिले.

 

अनेक वेब सीरिज आणि OTT वरील सिनेमांमध्ये दाखवल्या जाणाऱ्या गोष्टींबद्दल आमच्याकडे तक्रारी येत आहेत.  सध्या अस्तित्वात असलेले प्रेस काऊन्सिल कायदा, केबल टीव्ही कायदा आणि सेन्सॉर बोर्ड संबंधी कायदा हे ह्या web series ना आणि OTT platforms ना लागू नाहीत. त्यामुळे ह्यासाठी लवकरच नवीन मार्गदर्शक तत्वे जाहीर करू असे जावडेकर ह्यांनी सांगितले आहे.

 

गेले बरेच दिवस देशात तांडव, मिर्झापूर अशा काही web series मधल्या आक्षेपार्ह गोष्टींना विरोध होत होता. धार्मिक भावना दुखवल्याबद्दल ' तांडव ' विरुद्ध अनेक राज्यात FIR दाखल झाल्या होत्या. ह्या पार्श्वभूमीवर जावडेकर ह्यांचे हे वक्तव्य महत्त्वाचे आहे.

One thought on “वेब सीरिज, ओटीटी प्लॅटफॉर्म वर निर्बंध आणणार: केंद्र

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!