सिनेमागृहे १००% क्षमतेने सुरू करायला केंद्राची परवानगी
 

देशातील सिनेमागृहे १००% प्रेक्षकसंख्येसह सुरू करायला केंद्र सरकारने परवानगी दिली आहे.

कोरोना महामारीमुळे देशातील सिनेमागृहे ऑक्टोबर पर्यंत बंद होती. ऑक्टोबर मध्ये सरकारकडून ५०% प्रेक्षकसंख्येसह सिनेमागृहे चालू करायला परवानगी देण्यात आली होती. परंतु तरीही सिनेमा इंडस्ट्री रुळावर आली नव्हती. Industry ला प्रचंड आर्थिक नुकसान होत होते.

 

अखेर केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने २७ जानेवारी ला सिनेमागृहे वाढीव क्षमतेने चालू करायला परवानगी दिली आणि आज माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने सिनेमागृहे १००% खुली करत त्यासाठी SOP जाहीर केली.

  SOP for theatres   SOP cinema halls india law marathi   Cinema halls SOP  

सिनेमागृहे पूर्णपणे खुली होत असली तरी Corona संबंधी सर्व काळजी घेण्याचे निर्देश मालकांना देण्यात आले आहेत. Physical distancing , तापमान तपासणी, वेळेच्या अंतराने shows अशी सर्व काळजी थिएटर्स मालकांना घ्यावी लागणार आहे.

 

Containment Zones मधील सिनेमागृहे मात्र बंदच राहणार आहेत.

राज्य सरकारांना आपापल्या राज्यातली परिस्थिती बघून अधिक नियम लागू करता येतील. त्यामुळे आता महाराष्ट्र सरकार ह्याविषयी काय निर्णय घेते हे बघणे गरजेचे आहे.

 

केंद्राच्या ह्या निर्णयाचे सिनेसृष्टतील सर्वांकडून स्वागत होत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!