राष्ट्रपती भवनाकडून इंडिया टुडे ला खडसावणारे पत्र
 

राष्ट्रपतींच्या प्रेस सचिवांकडून India Today वृत्त संस्थेला एक खडसावणारे पत्र पाठवण्यात आले आहे. खोट्या बातम्या पसरवून राष्ट्रपती भवनाची गरिमा धोक्यात आणल्यामुळे हे पत्र लिहिले गेले आहे.

 

काय आहे प्रकरण?

२३ जानेवारी रोजी नेताजी सुभाष चंद्र बोस ह्यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद ह्यांनी नेताजींच्या एका प्रतिमेचे अनावरण केले होते.

Netaji portrait president covind

ह्यानंतर ट्विटर वरून अनेक लोकांनी ही प्रतिमा नेताजींची नसून बंगाली अभिनेते प्रसेनजित चटर्जी ह्यांची आहे असा दावा करायला सुरुवात केली. असा दावा करणाऱ्यांमध्ये इंडिया टुडे चे ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई, त्यांच्या पत्नी पत्रकार सागरिका घोष हे सुद्धा होते.

Netaji portrait controversy  

दिवसभर चाललेल्या ह्या वादावर अखेर नेताजींच्या कुटुंबातील श्री सी के बोस ह्यांनी हे पोर्ट्रेट नेताजींचे असल्याचे सांगितल्यावर पडदा पडला.

     

राष्ट्रपती भवनाकडून मात्र हे प्रकरण गांभीर्याने घेतले गेल्याचे दिसते आहे. थेट राष्ट्रपतींच्या कृत्याला चूक आणि वेडेपणाचे ठरवणारी ट्विट करणाऱ्या पत्रकारांनी किमान आधी खरे काय आहे ह्याची खात्री करून घेणे अपेक्षित होते असे ह्या पत्रात म्हणण्यात आले आहे. व्यावसायिक नैतिकता तर ह्यांनी सोडलीच परंतु आपल्या ह्या कृत्याने राष्ट्रपती भवनाची गरिमा धोक्यात आणली असे म्हणत इंडिया टुडे च्या अरुण पुरींना राष्ट्रपती भवनाकडून खडसावण्यात आले आहे.

  Netaji portrait rashtrapati bhavan india today    

आता इंडिया टुडे समूह राजदीप सरदेसाई आणि आपल्या इतर चुकलेल्या पत्रकारांवर काय कारवाई करणार हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे. ट्रॅक्टर रॅली दरम्यान टीव्ही वर खोटी बातमी दिल्याने सरदेसाई ह्यांच्यावर आधीच आपला पगार गमावण्याची वेळ आलेली आहे.

 

राष्ट्रपती भवन ह्या प्रकारात कुठली कायदेशीर कारवाई करणार का हा प्रश्नही आता सर्वांना पडला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!