न्या. गनेडिवालांना POCSO निकाल भोवला?

सुप्रीम कोर्ट को कडून न्या. पुष्पा गनेडिवाला ह्यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या स्थायी न्यायाधीशपदी नेमण्याची शिफारस मागे घेण्यात आली आहे. त्यांनी नुकत्याच दिलेल्या पोक्सो कायद्यावरील निकालावर सर्व स्तरातून टीका झाली होती. ह्याचाच परिणाम म्हणून हा निर्णय कोलेजियम कडून घेण्यात आल्याचे समजते.

 

न्या. गनेडिवाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात कार्यरत असून त्यांची अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नेमणूक झाली होती. २० जानेवारी ला collegium कडून त्यांना नियमित म्हणजेच स्थायी न्यायाधीश पदी नियुक्त करण्याच्या प्रस्तावाला  मंजुरी देण्यात आली आणि सरकारकडे ही शिफारस पाठवण्यात आली. ह्याविषयी वाचण्यासाठी इथे क्लिक करा

 

परंतु पुढच्याच दिवशी न्या. गनेडिवाला ह्यांनी १९ तारखेला दिलेला एक निकाल प्रसिद्ध झाला. ह्या निकालात त्यांनी 'कपडे न काढता एका अल्पवयीन मुलीच्या शरीलाला स्पर्श करणे म्हणजे POCSO कायद्याखाली लैंगिक अत्याचार नाही' असा निर्णय देत आरोपीला बरी केले.

ह्या निर्णयावर कायदा क्षेत्रातील तज्ज्ञांनी आणि समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेकांनी सडकून टीका केली. ह्यामुळेच collegium कडून त्यांना नियमित करण्याचा निर्णय मागे घेतला गेला असावा असे दिसते आहे.

6 thoughts on “न्या. गनेडिवालांना POCSO निकाल भोवला?

  1. Many Men & women in childhood have faced physical cruelty, as just even by touching by known family or relatives, leaving them disturbed. Hence decision favoring touching not amount to Cruelty in POSCO cases was a bad conclusion. This will increase crime against children.

  2. This kind of decisions are not expected from the judiciary whereby the security for tin ages can not be protected.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!