दिल्ली पोलिसांचे नागरिकांना आवाहन
दंगेखोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी नवी शक्कल
माहिती देणाऱ्याचे नाव सिक्रेट ठेवले जाणार
दिल्लीत २६ जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली अराजक माजवणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्याच्या उद्देशाने पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे.
8750871237 हा क्रमांक पोलिसांकडून जारी करण्यात आला आहे. दिल्लीत दंगल भडकवणाऱ्या कोणालाही तुम्ही ओळखत असाल तर या क्रमांकावर त्याची माहिती पोलिसांना द्यावी असे आवाहन करण्यात आले.
तसेच कोणत्याही स्वरूपाचे व्हिडीओ फुटेज, स्टेटमेंट तुमच्याकडे असेल तर तेदेखील पोलिसांना देण्यात यावे असेही दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे.
तसेच kisanandolanriots.26jan2021@gmail.com या मेलवरही तुम्ही माहिती देऊ शकता.

दिल्लीचे जॉईंट सिपी क्राईम, श्री . बी. के. सिंह यांच्या नावाने हे आवाहन करण्यात आले आहे.