पोलिस अधिकाऱ्यावर तलवार उगारणारा आंदोलक अटकेत
 

दिल्ली - हरयाणा सीमेजवळ कृषी कायदे विरोधकांनी आज हिंसाचार केला. ह्यात एका पोलिस अधिकाऱ्यावर तलवारीने वार करणारा एक आंदोलक आणि इतर ४३ हिंसक आंदोलकांना अटक करण्यात आली आहे.

 

कृषी कायदे विरोधी आंदोलक गेले २ महिने दिल्लीत ठिय्या देऊन आहेत. प्रजासत्ताकदिनी त्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीत प्रचंड हिंसाचार झाली आणि त्याची दृश्ये संपूर्ण देशाने बघितली. ह्यानंतर ह्या आंदोलकांवर देशभरातून टीका झाली. तरीही त्यांनी आपले आंदोलन मागे घेतलेले नाही.

 

आज हे आंदोलक दिल्ली - हरयाणाच्या सिंघु बॉर्डर वर आंदोलन करत होते. ह्यावेळी तिथल्या रहिवाश्यांनी आंदोलनामुळे होत असलेल्या त्रासातून आंदोलकांना विरोध केला. ह्या वेळी आंदोलकांनी हिंसाचार केला. ह्यात एका आंदोलकांनी थेट प्रदीप पालीवाल ह्या पोलिस अधिकाऱ्यावर तलवारीने वर करत त्या अधिकाऱ्याला जखमी केले.

 

ह्या सर्व आंदोलकांना अटक केल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी नुकतीच दिली आहे. दंगल, हिंसाचार, सरकारी कर्मचाऱ्यांच्या कामात अडथळा आणणे, पोलिसांवर हल्ला अशा विविध गुन्ह्यांसाठी ह्या आरोपींवर कारवाई होईल अशी शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!