२०२० दिल्ली दंगल: दोन आरोपींचा जामीन फेटाळला

फेब्रुवारी २०२० मध्ये दिल्लीत झालेल्या दंगलीच्या कटात सहभागी असणाऱ्या नताशा नरवाल आणि देवांगना कलिता ह्यांचा जामीन अर्ज दिल्लीतील कोर्टाने फेटाळला आहे.

 

CAA वरून दिल्लीत गेल्या वर्षी अनेक महिने रस्त्यावर उतरून विरोधक आंदोलन करत होते. शाहीन बाग येथे मुस्लिम स्त्री पुरुषांचे ठिय्या आंदोलन सुरू होते. ह्यानंतर फेब्रुवारी महिन्यात दिल्लीत दंगल घडवून आणण्यात आली. ह्यात अनेक निष्पाप लोकांचे बळी गेले. ही दंगल हा एका पूर्वनियोजित कटाचा परिणाम होती असे समोर आले. ह्या कटात अनेक असामाजिक तत्वे सामील होतील. त्यातीलच ह्या नताशा नरवाल आणि देवांगना कलिता. ह्या दोघी पिंजरा तोड नावाच्या एका चळवळीच्या कार्यकर्त्या आहेत. त्यांच्यावर महिलांना एकत्र करून रस्त्यावर चक्काजाम करणे, प्रक्षोभक, भडकवणारी भाषणे करणे, महिलांना काठ्या, दगड, ॲसिड अशा गोष्टी जमवून त्याचा वापर करायला प्रवृत्त करणे असे आरोप आहेत.

 

ह्या दोन्ही आरोपींना UAPA ( Unlawful Activities Prevention Act) अंतर्गत अटक करण्यात आली आहे. ह्या कायद्याअंतर्गत जर प्रथमदर्शनी आरोपीने गुन्हा केल्याचे दिसत असेल तर त्याला जामीन देता येत नाही.

 

दिल्लीतील कोर्टाने ह्या दोघींनी दंगलीच्या कटात सहभागी होऊन गुन्हा केल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट होते असे म्हंटले आहे. आणि त्यामुळेच ह्या दोघींचा जामीन अर्ज फेटाळून त्यांना तुरुंगातच ठेवण्याचा आदेश दिला आहे.

One thought on “२०२० दिल्ली दंगल: दोन आरोपींचा जामीन फेटाळला

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!