कोरोना महामारीमुळे राज्यातील न्यायालये बराच काळ बंद होती. काही न्यायालये ऑनलाईन पद्धतीने चालू होती. परंतु नियमित प्रत्यक्ष कामकाज सुरू नव्हते. आता मात्र ही परिस्थिती बदलणार असल्याचे समजते आहे.
व्यवस्थापकीय न्यायाधीश समितीने राज्यातील न्यायालयांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र, गोवा, दादरा नगर हवेली, दिव दमण येथील सर्व न्यायालये १ फेब्रुवारी पासून प्रत्यक्ष पद्धतीने आणि नियमित सुरू होतील. सर्व कोर्टांमध्ये १०० प्रत्यक्ष कामकाज सुरू होईल.

मुंबई हाय कोर्टाच्या रजिस्ट्रार जनरल ह्यांनी एका पत्राद्वारे राज्यातील सर्व न्यायालयांच्या प्रमुख न्यायाधिशांना हे निर्देश दिले आहेत. तसेच कोर्ट कामकाज सुरू करताना सर्व काळजी घेतली जावी आणि कोरोना बाबतचे सरकारचे सर्व आदेश पाळले जावेत असेही निर्देश देण्यात आले आहेत.