१ फेब्रुवारी पासून मुंबई लोकल सर्वांसाठी खुली
 

कोरोना मुळे मुंबई ची लोकल ट्रेन सेवा गेले कित्येक महिने सामान्य नागरिकांसाठी बंद होती. पण अखेर राज्य सरकारने लोकांच्या अडचणी लक्षात घेऊन १ फेब्रुवारी पासून लोकल ट्रेन सेवा सर्वांसाठी खुली करण्याचे ठरवले आहे.

 

ह्यापूर्वी फक्त अत्यावश्यक सेवा कर्मचारी लोकल ने प्रवास करू शकत होते. नंतर महिलांसाठी ठराविक वेळांमध्ये लोकल सेवा खुली झाली. आता १ फेब्रुवारी पासून महिला, पुरुष सर्वांसाठीच लोकल ट्रेन सेवा सुरू होणार.

 

परंतु सर्वसामान्य नागरिकांना दिवसभर लोकल ने प्रवास करण्याची मुभा नसेल. केवळ ठराविक वेळातच त्यांना लोकल ने प्रवास करता येईल. महिला व अत्यावश्यक सेवा कर्मचारी ह्यांना ह्या पूर्वी ज्या वेळात प्रवास करता येत होता त्यात बदल नाही.

 

सामान्य नागरिक कोणत्या वेळात लोकल ने प्रवास करू शकतील?

 

१) सकाळी लोकल सेवा सुरू झाल्या पासून सकाळच्या ७ वाजेपर्यंत.

२) दुपारी १२ पासून ४ पर्यंत

३) रात्री ९ वाजल्यापासून रात्रीच्या शेवटच्या लोकल पर्यंत

कधी प्रवास करता येणार नाही?

१) सकाळी ७ ते १२

    २) संध्याकाळी ४ ते ९   

महाराष्ट्र सरकारने रेल्वे ला दिलेल्या ह्या पत्रावरून ही माहिती मिळाली आहे.

Mumbai local resumes

  केंद्रीय रेल्वे मंत्री पियूष गोयल ह्यांनी महाराष्ट्र सरकारची ही विनंती मान्य करत सर्वसामान्यांसाठी ठराविक वेळात मुंबई लोकल ट्रेन सेवा सुरू केली आहे.    

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!