पाकिस्तान कोर्टाकडून अतिरेकी ओमर सईद शेख ची सुटका
 

पाकिस्तान च्या सुप्रीम कोर्टाने गुरुवारी अतिरेकी ओमर सईद शेख ह्याची सुटका केली आहे. अमेरिकन पत्रकार डॅनियल पर्ल ह्याचा निर्घृण खून केल्याच्या गुन्ह्यासाठी शेख तुरुंगात होता.

ओमर सईद शेख हा ब्रिटिश - पाकिस्तानी अतिरेकी आहे. २००२ मध्ये अमेरिकेच्या वॉशिंग्टन पोस्ट जर्नल ह्या वृत्तपत्राचा पत्रकार डॅनियल पर्ल पाकिस्तानात गेला होता. पाकिस्तानच्या आयएसआय आणि आंतरराष्ट्रीय इस्लामी दहशतवादी संघटना अल कायदा ह्यांच्या संबंधांबद्दल पुराव्यांचा शोध पर्ल घेत होता. त्याच वेळी ओमर सईद शेख ह्यानी पर्ल चे अपहरण केले आणि त्याचा शिरच्छेद करून निर्घृण खून केला. ह्याच गुन्ह्यासाठी त्याला पाकिस्तानात अटक होऊन शिक्षा झाली होती.

 

परंतु तेथील सिंध हाय कोर्टाने नुकतीच ही शिक्षा रद्द करण्याचा निर्णय दिला. ह्यावर पर्ल ह्याच्या मातापित्यांना तसेच सिंध राज्य सरकारने पाकिस्तान सुप्रीम कोर्टात अपील दाखल केले. ह्या अपिलावर निर्णय देताना पाकिस्तान सुप्रीम कोर्टाने ओमर सईद शेख ची सुटका करण्याचा आदेश दिला आणि त्याच्या इतर साथीदारांना सर्व आरोपातून मुक्त केले.

 

ह्या धक्कादायक निर्णयावर जगभरातून टीका होत आहे. भारत, अमेरिका आणि इतरही अनेक देशांनी ह्या निर्णयाचा निषेध केला आहे.

 
ह्याच ओमर सईद ला १९९४ मध्ये भारतात परदेशी नागरिकांच्या अपहरणाबद्दल अटक होऊन शिक्षा झाली होती. परंतु १९९९ मध्ये कंदाहार विमान हायजॅकिंग नंतर अपहरण झालेल्या नागरिकांच्या बदल्यात मसूद अझर बरोबर ओमर शेख  ची सुद्धा सुटका करावी लागली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!