फेक न्यूज प्रकरणी राजदीप सरदेसाई विरुद्ध उत्तर प्रदेशात एफआयआर
 

प्रजासत्ताक दिनी कृषी कायदे विरोधी ट्रॅक्टर रॅली आणि हिंसाचाराबाबत खोट्या बातम्या पासरवल्याच्या आरोपाखाली इंडिया टुडे चे पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्याविरुद्ध उत्तर प्रदेश पोलिसांनी नॉईडा येथे FIR दाखल केली आहे.

दिल्लीत झालेल्या हिंसाचाराच्या घटनेत पोलिसांची गोळी लागून एक आंदोलक मृत झाल्याची बातमी सरदेसाई ह्यांनी आपल्या चॅनल वर दिली होती. प्रत्यक्षात ह्या आंदोलकांचा मृत्यू त्याचा ट्रॅक्टर उलटल्याने झाला होता.

 

उत्तर प्रदेश पोलिसांच्या ह्या FIR मध्ये राजदीप सह काँग्रेस नेते शशी थरूर, नॅशनल हेरॉल्ड च्या मृणाल पांडे, Caravan वृत्त संस्थेचे संपादक, कार्यकारी संपादक ह्यांच्या विरुद्ध देखील गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

  FIR against Rajdeep Sardesai by UP police

ह्या सर्वांविरुद्ध खोट्या बातम्या पसरवणे, समाजात तेढ निर्माण करणे ह्यासह राष्ट्रद्रोहाचाही गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

2 thoughts on “फेक न्यूज प्रकरणी राजदीप सरदेसाई विरुद्ध उत्तर प्रदेशात एफआयआर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!