रिपब्लिक टीव्ही कडून नाविका कुमार विरुद्ध मानहानी ची क्रिमिनल केस
 

अर्णब गोस्वामी ह्यांच्या रिपब्लिक टीव्ही कडून टाइम्स नाऊ ह्या चॅनल च्या नाविका कुमार विरुद्ध मानहानी चा फौजदारी खटला दाखल करण्यात आला आहे.

 

१८ जानेवारी च्या आपल्या ' Newshour' ह्या कार्यक्रमात नाविका ह्यांनी अर्णब गोस्वामींबद्दल खोटी, आक्षेपार्ह वक्तव्ये केली असा रिपब्लिक चा आरोप आहे आणि ह्यातूनच हा खटला दाखल झाला आहे.

 

अर्णब ह्यांनी टाइम्स ना हे चॅनल सोडून रिपब्लिक टीव्ही ची स्थापना केली आणि काही दिवसातच रिपब्लिक हे इंग्लिश वृत्त वाहिन्यांमध्ये नंबर वन झाले. नाविका ह्यांना  अर्णब बद्दल व्यावसायिक आकस, आसुया निर्माण झाली. त्यांना त्यांच्या चॅनल ल रिपब्लिक च्या तोडीचे यश मिळवता आले नाही आणि ह्याच जेलसी मधून नविका ह्यांनी अर्णब आणि रिपब्लिक बद्दल मानहानीकारक वक्तव्ये केली. मुंबई पोलिसांच्या टीआरपी घोटाळ्यातील चार्जशीट चा चुकीचा अर्थ लावत, व्हॉट्सॲप संभाषणाचा आधार घेत वाट्टेल ती वक्तव्ये आणि आरोप नाविका कुमारांनी आपल्यावर केले. हे प्रकरण कोर्टात चालू असल्याचे भानही न ठेवता त्यांनी असे मानहानीकारक आरोप करत ते सर्वत्र प्रसिद्ध केले. असे आरोप रिपब्लिक कडून नाविका कुमारांवर करण्यात आले आहेत.

 

दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्ट येथे ही केस दाखल करण्यात आली असून यावरील सुनावणी २ फेब्रुवारी ला होण्याची शक्यता आहे.

 

रिपब्लिक कडून नुकतीच इंडीयन एक्स्प्रेस वृत्तपत्राला सुद्धा नोटीस पाठवण्यात आली होती. वाचा काय होते ह्या नोटिशीचे कारण

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!