मालकांना झालेल्या दंडासाठी NDTV चे शेअर्स गहाण
 

NDTV ह्या न्यूज चॅनलचे मालक प्रणय आणि राधिका रॉय ह्यांनी केलेल्या गैरव्यवहार प्रकरणी अपिलाची आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. ह्यावेळी आपल्याला झालेल्या दंडाची हमी म्हणून त्यांनी चॅनल चे शेअर कोर्टाला देऊ केले आहेत.

 

काय आहे प्रकरण?

२००८ झाली रॉय दांपत्याने एनडीटीव्ही च्या शेअर्स चे अनधिकृत व्यवहार करून तब्बल १७ कोटी रुपये अवैधरीत्या कमावले होते. हा गैरप्रकार २०१८ मध्ये सेबी ( Securities And Exchange Board of India) च्या लक्षात आला. सेबी ही शेअर मार्केट, स्टॉक एक्सचेंज मधल्या व्यवहारांवर नियंत्रण ठेवणारी केंद्रीय संस्था आहे. सेबी ने आपल्या अधिकारांचा वापर करून रॉय दाम्पत्याला १६.९७ कोटी रुपये आणि २००८ पासून चे ६% प्रमाणे व्याज अशी किंमत दंड म्हणून ठोठावली. तसेच रॉय दाम्पत्याला शेअर बाजारात व्यवहार करण्याला २ वर्ष बंदी केली.

  Prannoy Roy  

सेबी च्या ह्या निर्णयाविरुद्ध रॉय पती पत्नी अपिलीय प्राधिकरणाकडे दाद मागायला गेले. परंतु तुमचे appeal ऐकण्याआधी tumhi कोर्टात सेबी ने केलेल्या दंडाची अर्धी रक्कम जमा करा असे अपिलीय tribunal ने सांगितले. रॉय ह्यांनी ही रक्कम न जमा करता सुप्रीम कोर्टाकडे धाव घेतली.

 
सुप्रीम कोर्टाने आज एनडीटीव्ही च्या ह्या मालकांना त्यांनी हमी म्हणून काहीतरी रक्कम कोर्टाकडे जमा करावी लागेल असे सुनावले. ह्यावर रॉय ह्यांची बाजू मांडणारे सेलिब्रिटी, ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी ह्यांनी रॉय दाम्पत्याकडे काहीही संपत्ती शिल्लक नसल्याचे सांगितले. एनडीटीव्ही हे चॅनल देखील कसेबसे चालत आहे असेही त्यांनी कोर्टात नमूद केले. त्यामुळे आपल्याकडे चॅनल चे उरलेले शेअर हीच काय ती संपत्ती शिल्लक आहे आणि आपण तेच कोर्टाला हमी म्हणून देऊ शकतो असेही त्यांच्या वतीने सांगण्यात  आले.
 

कोर्टाने ह्या शेअर्स ची किंमत विचारली. त्यावेळी रॉय पती पत्नींकडे ५० लाख शेअर्स असून आज एनडीटीव्ही च्या शेअर्स चा भाव ₹₹₹. ३७ प्रती शेअर एवढा असल्याची माहिती त्यांनी कोर्टाला दिली. सुप्रीम कोर्टाने आज सुनावणी अंती रॉय ह्यांचे वकील रोहतगी ह्यांना रॉय ह्यांच्याकडे असलेल्या शेअर्स च्या किमतीचे स्टेटमेंट मागितले आहे. पुढील सुनावणीत हे स्टेटमेंट बघून हे शेअर्स हमी म्हणून जमा करून घ्यायचे की नाही ह्यावर कोर्ट निर्णय करेल.

 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!