भारतीय किसान युनियन चे प्रवक्ते राकेश टिकायत ह्याच्या गाझिपुर बॉर्डर वरील तंबू बाहेर दिल्ली पोलिसांनी कारणे दाखवा नोटीस लावली आहे.

प्रजासत्ताक दिनी दिल्लीत काढण्यात आलेल्या शेतकरी ट्रॅक्टर रॅलीत प्रचंड हिंसाचार झाला. ह्या रॅली चे नेतृत्व टिकायत करत होते. आंदोलकांना भडकावणारी भाषणे करतानाचे त्यांचे व्हिडिओ सुद्धा समोर आले. रॅली च्या आयोजनाविषयी दिल्ली पोलिस आणि आंदोलकांमध्ये काही नियमांवर परस्पर सहमती झाली होती. परंतु आंदोलकांनी हे नियम धुडकावून लावले. ह्या नियमांचा भंग केल्याबद्दल तुमच्यावर कायदेशीर कारवाई का करू नये असे ह्या नोटिशीत टिकायत ह्यांना विचारण्यात आले आहे. तसेच हिंसाचारात सामील असलेल्या त्यांच्या कार्यकर्त्यांची नावे पोलिसांनी मागितली आहेत. ह्या नोटिशीला ३ दिवसांच्या आत उत्तर द्यावे लागणार आहे.
कालच दिल्ली पोलिसांकडून पत्रकार परिषद घेण्यात अली. त्यात सर्व गुन्हेगारांवर कठोर कारवाई होईल असे आश्वासन पोलिसांनी देशाच्या जनतेला दिले. ह्या पत्रकार परिषदेत दिली पोलिस आयुक्त नेमके काय म्हणाले वाचण्यासाठी इथे क्लिक करा
योगेंद्र यादव ह्यांना देखील करणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे. पोलिसांनी आता आंदोलक आणि त्यांच्या नेत्यांवर कारवाई चा बडगा उगारला आहे असे आता म्हणता येईल. अनेक नागरिकांनी सोशल मीडिया वरून दिल्ली पोलिसांच्या कारवाईला आपला पाठिंबा असल्याचे मत व्यक्त केले आहे.