हिंदू देवतांचा अपमान करणाऱ्या कॉमेडियन ला जामीन नाही
   

मध्य प्रदेश हाय कोर्टाने हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्याबद्दल अटकेत असलेल्या कॉमेडियन मुनव्वर फारुकी चा जामीन अर्ज आज फेटाळला.

 

इंदूर शहरात झालेल्या एका कार्यक्रमात व्यावसायिक स्टँड उप कॉमेडी चा प्रयोग करताना मुनव्वर फारुकी ह्याने हिंदू देवी देवतांबद्दल अत्यंत अपमानजनक वक्तव्ये केली होती. त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल झाल्यावर त्याला पोलिसांनी २ जानेवारी ला अटक केली होती.

 

मध्य प्रदेश हाय कोर्टाच्या न्या रोहित आर्य ह्यांच्यासमोर सुनावणी झाली. फारुकी ह्याने श्री राम आणि देवी सीता यांच्याविषयी अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्ये केली. ही वक्तव्ये त्यांनी जाणीवपूर्वक केली आणि नागरिकांच्या एका वर्गाच्या भावना दुखावल्या आहे निरीक्षण कोर्टाने नोंदवले.

 

एका देशात राहताना नागरिकांमध्ये परस्पर आदर आणि विश्वास असणे गरजेचे असते. असा आदर, विश्वास आणि बंधुभाव प्रस्थापित करणे हे सरकार आणि सर्व नागरिकांचे कर्तव्य असते असेही कोर्टाकडून नोंदवण्यात आले. फारुकी ह्यानी प्रथमदर्शनी हा गुन्हा केला असल्याचे दिसत आहे आणि त्याला जामीन देण्याचे कोणतेही ठोस कारण आमच्यासमोर नाही असे म्हणत कोर्टाने हा जामीन अर्ज फेटाळून लावला.

 

LawMarathi ने हा जामीन फेटाळला जाण्याची शक्यता असल्याचे वृत्त मागच्या आठवड्यातच दिले होते. ते ह्या लिंक वर वाचता येईल

2 thoughts on “हिंदू देवतांचा अपमान करणाऱ्या कॉमेडियन ला जामीन नाही

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!