दिल्ली हिंसाचार : ३९४ पोलिस जखमी, २५ एफआयआर दाखल
 

प्रजासत्ताक दिनाला दिल्ली मध्ये कृषी कायदे विरोधी आंदोलकांनी केलेल्या हिंसाचारात ३९४ पोलिस कर्मचारी जखमी झाले आणि ह्या प्रकरणात आत्तापर्यंत २५ FIR दाखल झाल्या असल्याची माहिती आज दिल्ली पोलिसांकडून देण्यात आली.

 

दिल्लीचे पोलिस आयुक्त एस. एन. श्रीवास्तव ह्यांनी आज संध्याकाळी पत्रकार परिषद घेतली. ह्या पत्रकार परिषदेत त्यांनी काल घडलेल्या भयंकर प्रकारची सविस्तर माहिती दिली.

 

कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या संघटनांनी प्रजासत्ताक दिनी दिल्लीत ट्रॅक्टर रॅली काढण्याची योजना आखली होती. आपण शांततापूर्ण पद्धतीने ही रॅली काढू असे आश्वासन त्यांच्याकडून सरकार व सुप्रीम कोर्टाला देण्यात आले होते.

 

मात्र पोलिसांनी ठरवून दिलेल्या नियमांचा भंग करून ही रॅली काढली गेली. ठरवून दिलेल्या मार्गावरून न जाता ही रॅली थेट लाल किल्ल्याकडे गेली. आंदोलकांनी काठ्या, तलवारी अशी शस्त्रे बरोबर आणली आणि त्यांचा प्रयोग करत हिंसा केली. आंदोलकांनी ट्रॅक्टर चालवत बॅरिकेड्स तोडली, पोलिसांवर हल्ले केले. पोलिसांशी आधी झालेल्या चर्चेत परस्पर सहमतीने झालेले नियम, निर्णय आंदोलकांनी पाळले नाहीत आणि दिल्ली पोलिसांचा विश्वासघात केला. ह्या कृत्यात सर्व शेतकरी नेते सामील होती आणि त्यांनी हिंसेला उद्युक्त करणारी भाषणे केली. ह्या प्रकारात सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले. अशी माहिती ह्या पत्रकार परिषदेत पोलिस आयुक्तांनी दिली.

 

आपल्याकडे संपूर्ण घटनेचे व्हिडिओ फुटेज असून आपण facial recognition तंत्रज्ञानाचा वापर करून सर्व गुन्हेगारांची ओळख पटवू आणि त्यांच्यावर लवकरच कठोर कारवाई करू असे श्रीवास्तव ह्यांनी सांगितले.

 

आत्तापर्यंत आपण १९ आरोपींना अटक केली असून ५० आरोपींना ताब्यात घेतले आहे अशीही माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

 

पोलिसांनी ह्या प्रकरणात दाखल केलेल्या तक्रारींमध्ये आंदोलकांचे नेते राकेश टिकायत, दीप सिद्धू, योगेंद्र यादव तसेच मेधा पाटकर ह्यांची नावे असल्याचे समजते.

 

One thought on “दिल्ली हिंसाचार : ३९४ पोलिस जखमी, २५ एफआयआर दाखल

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!