विराट कोहलीला केरळ हाय कोर्टाची नोटीस – वाचा काय केले कोहलीने
 

केरळ हाय कोर्टात ऑनलाईन जुगार, सट्टा, रम्मी अशा खेळांवर बंदी आणावी ह्यासाठी याचिका दाखल झाली आहे. ह्या याचिकेच्या सुनावणीत बुधवारी कोर्टाने भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली ह्याला नोटीस बजावली आहे.

 

मोबाईल प्रीमियर लीग ( MPL) व इतर एका ऑनलाईन गेमिंग प्लॅटफॉर्म विरोधात ही याचिका आहे. तसेच केरळ सरकारला देसखील ह्यात पार्टी करण्यात आले आहे.

 

विराट ला नोटीस का?

ह्या ऑनलाईन जुगार आणि गेमिंग प्लॅटफॉर्म मुळे सामान्य लोक फसवले जात आहे असे याचिकाकर्त्याचे  म्हणणे आहे. विराट कोहली हा ह्या MPL चा ब्रँड ॲम्बेसेडर आहे आणि त्याला पाहून अनेक लोक ह्या प्रकाराकडे आकर्षित होतात. ह्यातून लोक लुबाडले जात आहेत. आणि विराट कोहली सारखे ह्या प्लॅटफॉर्म ची जाहिरात करणारे सेलिब्रिटी लोकांच्या फसवणुकीला जबाबदार आहेत असेही याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.

विराट कोहली सह अभिनेत्री तमन्ना भाटिया देखील MPL ची जाहिरात करत असल्याने तिच्यावर देखील नोटीस बजावण्यात आली आहे.

 

जुगार आणि सट्टेबाजी वर नियंत्रण ठेवण्यासाठी सध्या राज्यात अस्तित्वात असलेला ' केरळ गेमिंग ॲक्ट ' हा ऑनलाईन खेळांना लागू नाही. त्यामुळे केरळ सरकारला ऑनलाईन जुगारी खेळांवर नियंत्रण आणणारा कायदा करण्याचे निर्देश द्यावे अशी मागणी याचिकेद्वारे केली गेली आहे.

 

ऑनलाईन गेमिंग वर नियंत्रण आणण्याची मागणी विविध राज्यांमध्ये झाली असून गुजरात आणि मद्रास हाय कोर्टाने त्या त्या राज्यांना ह्याविषयी नियम करण्याचे निर्देश दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!