२६ जानेवारी ला दिल्लीत कृषी कायदे विरोधी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीत झालेल्या हिंसेची दखल घ्यावी अशी मागणी करणारे पत्र मुंबईतील कायदे अभ्यासक आणि स्तंभलेखक सोमेश कोलगे ह्यांनी भारताचे सरन्यायाधीश शरद बोबडे ह्यांना लिहिले आहे.
प्रजासत्ताक दिनी कृषी कायदे विरोधी आंदोलकांनी दिल्लीत ट्रॅक्टर रॅली काढली. ह्या रॅली दरम्यान आंदोलकांनी प्रचंड हिंसाचार केला. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले. अनेक पोलिस कर्मचारी ह्या आंदोलकांना थांबवताना गंभीर जखमी झाले. आंदोलकांनी लाल किल्ल्यावर जाऊन तेथील राष्ट्रध्वज काढून आपले निशाण तेथे फडकावले. ह्या सगळ्या हिंसेची दृश्ये काल संपूर्ण देशाने टीव्ही आणि सोशल मीडिया वर बघितली. ही दृश्ये बघून नागरिक संतप्त आणि व्यथित झाल्याचे दिसत आहे. ह्यातूनच काही नागरिक थेट कोर्टाकडे धाव घेताना दिसत आहेत.
मुंबईचे कायदे अभ्यासक आणि दैनिक तरुण भारत चे स्तंभलेखक सोमेश कोलगे यांनीही थेट सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावणारे पत्र सरन्यायाधीश शरद बोबडे ह्यांच्या नावे लिहिले आहे.
हे हिंसक आंदोलन बघताना आपल्या मन आणि सदसद्विवेकबुद्धी ला मोठा धक्का बसला आहे, असे ह्या पत्रात कोलगे ह्यांनी लिहिले आहे. सुप्रीम कोर्टाने स्वतःहून ह्या आंदोलकांची दखल घेत त्यांच्यात आणि सरकारमध्ये मध्यस्थीसाठी एक समिती नेमली होती. असे असूनही आंदोलकांनी लाल किल्ल्यावर हिंसक कृत्ये केली, हे बघणे भयंकर होते असेही पत्रात म्हंटले गेले आहे.
ह्या आंदोलनकर्त्यांना ' शेतकरी ' म्हणून संबोधणे हा शेतकऱ्यांचा अपमान आहे आणि म्हणूनच कोर्टाने सर्व माध्यमांना असा आदेश द्यावा की ह्या आंदोलकांना 'आरोपी' म्हणून संबोधावे , शेतकरी म्हणून नाही, अशी मागणी ह्या पत्रात करण्यात आली आहे. तसेच आंदोलकांना दंड करावा आणि झालेल्या सर्व नुकसानाची भरपाई त्यांच्याकडून करून घ्यावी अशीही मागणी कोलगे ह्यांनी आपल्या पत्राद्वारे केली आहे.
हे पत्र वाचण्यासाठी इथे क्लिक करा
मुंबईच्याच एका लॉ च्या विद्यार्थ्याने असेच पत्र सरन्यायाधीशांना लिहिले आहे, त्याविषयी सविस्तर बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा
Respected CJI
Don’t spare even a single in and behind the event