खोट्या बातम्या छापू नका – रिपब्लिक टीव्ही ची इंडियन एक्स्प्रेस ला नोटीस
 

अर्णब गोस्वामी ह्यांनी आपल्या चॅनल चे टीआरपी वाढवण्यासाठी पर्थो दासगुप्ता ह्यांना लाच दिली अशा आशयाची बातमी छापल्यामुळे अर्णब च्या रिपब्लिक मीडिया कडून इंडियन एक्स्प्रेस वृत्तपत्राला नोटीस पाठवण्यात आली आहे.

 

इंडियन एक्स्प्रेस मध्ये २५ जानेवारी ला ' Arnab Goswami paid me $12,000 and Rs 40 lakh to fix ratings : Partho Dasgupta ' अशा शीर्षकाची एक बातमी प्रसिद्ध झाली होती. ह्या बातमीबद्दल आक्षेप असल्याने रिपब्लिक तर्फे ही नोटीस पाठवण्यात आली आहे.

 

ही बातमी खोटी, बिनबुडाची, चूक आणि खरेखोटे न तपासता लिहिली असल्याचे नोटीस मध्ये म्हणले आहे. दासगुप्ता ह्यांनी हा जबाब पोलिसांच्या दबावामुळे दिला आणि तो कोर्टात चालणारा नाही तसेच त्यांनी स्वतः नंतर हा जबाब नाकारला, ह्या गोष्टी सदर बातमीत नाहीत असेही ह्यात म्हणले आहे. हाय कोर्टापुढे हे प्रकरण चालू असताना अशी बातमी छापणे चूक आहे आणि एक्स्प्रेस ने वाईट हेतून, मुद्दाम अर्णव ह्यांची प्रतिमा मलीन करण्यासाठी हे केले आहे असेही ह्यात लिहिलेले आहे.

 

एक्स्प्रेस ने अशा खोट्या बातम्या छापणे तात्काळ थांबवावे आणि ह्या बातमी बद्दल जाहीर माफीनामा प्रसिद्ध करावा तसेच त्यातील सर्व तथ्यांचा खुलासा करणारी दुरुस्ती सुद्धा छापावी अशी ताकीद रिपब्लिक कडून एक्स्प्रेस ला देण्यात आली आहे.

   

ही नोटीस वाचण्यासाठी इथे क्लिक करा

   

ह्या नोटिशिला एक्स्प्रेस कडून काय उत्तर मिळते हे लवकरच कळेल. दोन वृत्तसंस्थांमधला हा संघर्ष नेमके कुठले वळण घेणार हे त्यानंतरच समजेल.

One thought on “खोट्या बातम्या छापू नका – रिपब्लिक टीव्ही ची इंडियन एक्स्प्रेस ला नोटीस

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!