लाल किल्ला हिंसाचाराची दखल घ्या – मुंबईच्या विद्यार्थ्याचे सरन्यायाधीशांना पत्र
 

२६ जानेवारी ला दिल्लीत कृषी कायदे विरोधी ट्रॅक्टर रॅली झाली आणि ह्या रॅलीत प्रचंड हिंसाचार झाला. आंदोलकांनी लाल किल्ल्यावर आपला झेंडा लावला, सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान झाले. ह्याविषयी सुप्रीम कोर्टाने एक विशेष चौकशी समिती नेमावी अशी विनंती करणारे पत्र मुंबईच्या एका विद्यार्थ्याने देशाचे सरन्यायाधीश शरद बोबडे ह्यांना लिहिले आहे.

 

मुंबई मधील अंधेरी पूर्व येथे राहणाऱ्या आशिष राय ह्या विधी शाखेच्या विद्यार्थ्याने हे पत्र लिहिले आहे.

  Mumbai law student writes letter to CJI seeking action against Red Fort incident    

आंदोलकांनी भारताचा सांस्कृतिक वारसा असलेल्या लाल किल्ल्यावर नासधूस केली. तेथे देशाचा झेंडा उतरवून एका समाजाचा झेंडा लावला. ह्याने देशाची जनता व्यथित झाली आहे. ह्या लाजिरवाण्या घटनेने राष्ट्रध्वजाचा आणि संविधानाचा अपमान झाला आहे असे ह्या पत्रात लिहिले आहे.

 

ह्या पत्राची दखल सरन्यायाधीश घेणार का आणि घेतली तर काय कारवाई करणार असा प्रश्न आता आहे.

   

One thought on “लाल किल्ला हिंसाचाराची दखल घ्या – मुंबईच्या विद्यार्थ्याचे सरन्यायाधीशांना पत्र

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!