ध्वजारोहणापूर्वी संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन करा: पहा सरकारचे नवे सर्क्युलर 
 

 भारताची राज्यघटना दिनांक २६ नोव्हेंबर, १९४९ (Republic Day) रोजी स्वीकारण्यात आली. या निमित्ताने प्रत्येक वर्षी २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन (Constitution Day) म्हणून साजरा केला जातो. 

   

"संविधान दिनांक २६ जानेवारी,१९५० पासून अंमलात आले असून भारतीय संविधानाची पुरेशी माहिती नागरिकांना असणे आवश्यक आहे. भारतीय राज्य घटनेतील मुलतत्त्वांची व्याप्ती व सर्व समावेशकता सर्व नागरिकांना समजावी आणि त्याचबरोबर घटनेतील न्याय, स्वातंत्र्य, समानता व बंधुता ही मुलतत्वे समाज मनावर कोरली जावीत यासाठी संविधानाचा परिपूर्ण परिचय नागरिकांना होणे आवश्यक आहे", असे ग्रामविकास विभागाने जारी केलेल्या परिपत्रकात (Circular) म्हटले आहे. 

   

राज्य सरकारचे सर्क्युलर डाउनलोड करण्यासाठी किंवा पाहण्यासाठी क्लिक करा

     

"भारतीय संविधानातील मुलतत्त्वे, संवैधानिक हक्क आणि कर्तव्ये स्वतंत्र भारताच्या नागरिकांना संस्कारित करणारी असून नागरिकांच्या मनात याची रुजवणूक झाल्यास जबाबदार, सुजाण व सुसंस्कृत नागरिक घडविण्यास मदत होईल", असेही सरकारने सांगितले आहे. 

   

#LawMarathi @LawMarathi

   

त्यामूळे दिनांक २६ जानेवारी, २०२० पासून दरवर्षी हो‎णाऱ्या ध्वजारोहण कार्यक्रमापुर्वी भारताच्या संविधानामधील उद्देशिका (सरनामा) / Preamble याचे सामुहिक वाचन करण्यात यावे, असे परिपत्रक महाराष्ट्र सरकारच्या ग्रामविकास विभागाने जारी केले आहे. 

        LawMarathi

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!