प्रदूषण करणाऱ्या जुन्या गाड्यांवर आता ग्रीन टॅक्स हा अतिरिक्त कर लावण्याच्या प्रस्तावाला रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी ह्यांनी मंजुरी दिली आहे.
हा प्रस्ताव आता सर्व राज्यांकडे त्यांच्या सूचनांसाठी पाठवण्यात येईल. त्यानंतर ह्या सूचना लक्षात घेऊन अंतिम निर्णय घेतला जाईल. असा निर्णय केंद्राने केल्यास आता जुन्या प्रदूषण करणाऱ्या गाड्यांच्या मालकांना हा अतिरिक्त कर भरावा लागेल.
पर्यावरणाच्या समस्या, वायू प्रदूषण ह्याचा सामना करण्यासाठी हा निर्णय घेतला गेला आहे.