लोकांच्या धार्मिक भावनांचा गैरफायदा का घेता?- कॉमेडियन ला कोर्टाचा सवाल
   

मध्या प्रदेश हाय कोर्टासमोर कॉमेडियन मुनव्वर फारुकी ह्याच्या याचिकेवर सुनावणी झाली. इंदूर येथे झालेल्या एका कार्यक्रमात हिंदू देवी देवतांचा अपमान करणारी वक्तव्ये केल्याच्या कारणावरून राणा यांच्याविरुद्ध FIR दाखल झाली होती. ह्यानंतर त्यांना इंदूर पोलिसांनी अटक केली. त्यावर त्याने जामीन अर्ज दाखल केला होता. हा जामीन अर्ज सेशन कोर्टाने फेटाळला. ह्यामुळे राणा ने हाय कोर्टात याचिका दाखल करत आपल्याला जामीन मिळवा अशी मागणी केली.

 

मध्या प्रदेश हाय कोर्टात न्यायमूर्ती रोहित आर्य यांच्यासमोर ह्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. आज ह्या सुनावणीत न्या आर्य ह्यांनी काही मते व्यक्त केली. ह्या मतांवरून असे सूचित झाले की राणा ह्याला जामीन मिळण्याची शक्यता धूसर आहे. ह्या प्रकरणात कोर्टाने आपला निकाल राखून ठेवला आहे.

लोकांच्या धार्मिक भावनांचा असा गैरफायदा तुम्ही का घेता? केवळ आपल्या व्यावसायिक फायद्यासाठी तुम्ही असे कसे करू शकता? तुमच्या मानसिकतेला हे काय झालंय? असे सवाल ह्या सुनावणीत न्यायमूर्तींनी केले. तसेच अशा लोकांना सोडून देता कामा नये असेही न्या आर्य म्हणाले.

 

आता ह्या मातांवरून तरी अशी शक्यता आहे की फारुकी ह्याचा जामीन मंजूर केला जाणार नाही. परंतु कोर्टाचा अंतिम निर्णय राखून ठेवलेला असल्याने ह्या प्रकरणात नक्की काय होणार हे बघणे उत्सुकतेचे ठरेल.

One thought on “लोकांच्या धार्मिक भावनांचा गैरफायदा का घेता?- कॉमेडियन ला कोर्टाचा सवाल

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!