यूपीएससी २०२१ चे नोटिफिकेशन फेब्रुवारी नंतरच
 

यूपीएससी परीक्षा देणाऱ्या २०२० मध्ये अंतिम संधी होऊन गेलेल्या उमेदवारांना कोरोना मुळे आलेल्या अडचणी लक्षात घेता एक attempt ( संधी) वाढवून मिळावी ह्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाली होती. ह्या याचिकेवर आज झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने केंद्राला निर्देश दिले आहेत की ह्या याचिकेचा अंतिम निर्णय होईपर्यंत २०२१ चे नवीन नोटिफिकेशन काढू नये.

 

मागील सुनावणीत केंद्राने आपण अतिरिक्त संधी देण्याच्या विरोधात असल्याचे सूचित केले होते. त्या सुनवणीचा हा रिपोर्ट

आता ह्या प्रकरणाची पुढील सुनावणी २८ जानेवारी ला होणार आहे. फेब्रुवारी पर्यंत तरी २०२१ चे UPSC चे नोटिफिकेशन निघणार नाही असे ह्यामुळे स्पष्ट झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!