महाराष्ट्राच्या मंत्रालयात एक धक्कादायक गैरप्रकार घडला आहे. मुख्यमंत्र्यांनी सही केलेल्या फाईल मधला मजकूर नंतर अज्ञात व्यक्तींकडून बदलण्यात आला आहे.
नेमके काय घडले?
जे जे स्कूल ऑफ आर्ट च्या बांधकामात अनियमितता आढळल्याने सार्वजनिक बांधकाम विभागातील काही अभियंत्यांची चौकशी करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवण्यात आला होता.
ह्या प्रस्तावाला मंजुरी देत मुख्यमंत्र्यांनी ही चौकशी व्हावी असे आदेश दिले. ह्यापैकी एक अभियंता नाना पवार ह्यांच्या चौकशी संबंधी फाईल मध्ये मुख्यमंत्र्यांनी सही केल्यानंतर फेरफार झाल्याचे लक्षात आले.
मुख्यमंत्र्यांच्या सहीच्या वरती लाल अक्षरात चौकशी बंद करावी असा शेरा लिहिण्यात आला. ही फाईल सार्वजनिक बांधकाम विभागाकडे परत गेली त्यावेळी मंत्री अशोक चव्हाण ह्यांना ह्या शेऱ्या विषयी शंका आली. मुख्यमंत्री केवळ ह्या एकाच अभियंत्याची चौकशी बंद करा असा आदेश का करतील अशी शंका आल्याने अशोक चव्हाणांनी ह्या विषयात कार्यवाही केली. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी असा कुठलाही शेरा लिहिलेला नसल्याचे उघड झाले.
ह्या प्रकरणे मंत्रालयात चांगलीच खळबळ माजली असून शासनाची नाचक्की झाली आहे. ह्या प्रकरणात मुंबई च्या मरीन ड्राइव्ह पोलिस स्टेशनमध्ये cheating म्हणजेच ठकवणुक आणि कागदपत्रांचे बनावटीकरण असे गुन्हे दाखल झाले आहेत. आता पोलिस तपासानंतर नेमका ह्यात कोणाचा हात होता हे पुढे येईल अशी आशा आहे.