नागपूर येथील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठासाठी मदत निधी म्हणून १० कोटी रुपयांची तरतूद करण्यात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे.
नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री काँग्रेस चे नितीन राऊत ह्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. नितीन राऊत ह्यांनी एका ट्विट द्वारे ही माहिती दिली.
नागपूर जिल्हा नियोजन समितीची बैठक आज माझ्या अध्यक्षतेखाली पार पडली. तीर्थस्थळ आंभोरा विकास आराखडा, ग्रामीण रुग्णालय काटोल येथे १०० खाटांचे रुग्णालय विकास, राष्ट्रीय विधी विद्यापीठाला १० कोटींची सहायता निधी अश्या महत्वाच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली.@AnilDeshmukhNCP pic.twitter.com/ZA5cizr59M
— Dr. Nitin Raut (@NitinRaut_INC) January 23, 2021