पीएमसी घोटाळाप्रकरणी भाई ठाकूर यांच्यावर ED ची धाड
 

वसई-विरार-पालघर येथे दबदबा असलेले भाई ठाकुर control करीत असलेल्या विवा ट्रस्टवर  Enforcement Directorateने आज सकाळी धाडी टाकल्याचे समजते. पीएमसी घोटाळयाप्रकरणी सुरू असलेल्या चौकशीत ही कारवाई झाल्याचे समजते.

 

साधारणतः 6,500 करोडचा पीएमसी बँक घोटाळा आहे. त्यामध्ये सारंग वाधवान आणि राकेश वाधवान यांच्यावर मुख्य आरोप ठेवण्यात आले आहेत. भाई ठाकुर यांच्या viva trust आणि वादग्रस्त HDIL यांच्यात काही आर्थिक व्यवहार झाले होते, अशी माहिती समोर येते आहे. त्यानुषंगाने EDकडून आज धाड टाकण्यात आली असावी.

 

भाई ठाकुर यांच्यावर पूर्वी टाडाअंतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आला होता. भाई ठाकुर यांचे भाऊ हितेंद्र ठाकुर आमदार असून त्यांच्या बहुजन विकास आघाडीने महाराष्ट्र सरकारला पाठिंबा दिला आहे.

One thought on “पीएमसी घोटाळाप्रकरणी भाई ठाकूर यांच्यावर ED ची धाड

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!