‘ द व्हाईट टायगर ‘ च्या रिलीज ला स्थगिती नाही
 

The White Tiger ह्या नेटफ्लिक्स वर प्रदर्शित होऊ घातलेल्या चित्रपटाविरोधात जॉन हार्ट ह्या अमेरिकी चित्रपट निर्मात्याने दिल्ली हाय कोर्टात याचिका केली होती व चित्रपटाच्या रिलीज वर स्टे द्यावा अशी मागणी केली होती. ह्यावर दिल्ली हाय कोर्टाने स्टे देण्यास नकार दिला आहे.

 

अरविंद अडिगा ह्यांच्या The White Tiger नावाच्या पुस्तकावर आधारित ह्याच नावाचा चित्रपट २२ जानेवारी ला Netflix वर रिलीज होणार आहे.

 

ह्या चित्रपटाने आपल्या copyright चा भंग केला आहे, असे अमेरिकी चित्रपट निर्माता जॉन हार्ट ह्याचे म्हणणे आहे. अडीगा ह्यांच्या पुस्तकावर सिनेमा काढण्याचे अधिकार आपण आधीच विकत घेतलेले आहेत त्यामुळे दुसरे कोणीही त्यावर आधारित सिनेमा करू शकत नाही. तसे केल्यास तो आपल्या अधिकाराचा भंग आहे असा हार्ट ह्याचा दावा आहे. आणि त्यामुळे Netflix च्या ह्या सिनेमा विरोधात हार्ट ह्याने रिलीज च्या आदल्या दिवशी याचिका दाखल करत स्थगिती ची मागणी केली.

 

दिल्ली हाय कोर्टाने संध्याकाळी ७ वाजता तातडीने ह्या याचिकेवर सुनावणी घेतली. परंतु याचिकाकर्त्याने शेवटच्या क्षणी स्थगिती साठी कोर्टाकडे येणे बरोबर नाही असे कोर्टाचे मत झाले. गेले दीड वर्ष संधी असूनही चित्रपट रिलीज व्हायच्या काही तास आधी हार्ट ह्यांनी कोर्टात धाव घेणे बरोबर नाही असेही कोर्टाचे म्हणणे झाले. एखादा चित्रपट प्रदर्शित होणे थांबवल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. आणि चित्रीकरण असे थांबवण्यासाठी कोणतेही ठोस कारण याचिकाकर्त्याना दाखवता आलेले नाही असेही कोर्टाने ह्यावेळी म्हंटले.

 

दिल्ली हाय कोर्टाच्या ह्या निर्णयामुळे आता प्रियांका चोप्रा आणि राजकुमार राव ह्यांच्या ह्या चित्रपटाचा मार्ग मोकळा झाला असून तो उद्या Netflix वर प्रदर्शित होईल.

 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!