सुप्रीम कोर्टाच्या कोलेजियम ने मुंबई उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायाधीश श्रीमती पुष्पा गनेडिवाला ह्यांना स्थायी म्हणजेच कायमस्वरूपी न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे.

न्या गनेडिवाला ह्यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायाधीश पदी नेमणूक फेब्रुवारी २०१९ मध्ये झाली होती. ही नेमणूक तात्पुरती असते. परंतु २० जानेवारी २०२१ च्या ठरावाद्वारे collegium ने गनेडिवाला ह्यांना स्थायी न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे.
Collegium म्हणजे सुप्रीम कोर्टातील वरिष्ठ न्यायमूर्तींचा गट. ह्या गटाकडे न्यायाधीशांच्या नियुक्तीची जबाबदारी असते.
गनेडिवाला ह्या २००७ मध्ये जिल्हा न्यायाधीश म्हणून नियुक्त झाल्या. त्यापूर्वी त्या अमरावती येथे वकिली करत होत्या. त्यांनी मुंबईतील city civil court येथे प्रमुख न्यायाधीश म्हणून काम पाहिले.
त्यांच्या स्थायी न्यायाधीशपदी नियुक्तीने मुंबई उच्च न्यायालयातील महिला न्यायमूर्तींचा टक्का वाढणार आहे.
One thought on “न्या. पुष्पा गनेडिवाला मुंबई उच्च न्यायालयाच्या स्थायी न्यायाधीश होणार.”