मराठा आरक्षण घोळ – एमपीएससी सुप्रीम कोर्टातील याचिका मागे घेणार.
 

मराठा आरक्षणाच्या लाभार्थ्यांची निवड रद्द करून आपला निकाल पुन्हा लावता यावा ह्यासाठी सुप्रीम कोर्टात केलेली याचिका एमपीएससी मागे घेणार आहे.

 

मराठा आरक्षणाच्या वैधतेवर काल सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असताना एमपीएससी कडून अशी याचिका दाखल झाल्याचे राज्य सरकारला समजले. ह्यामुळे एकीकडे सरकार आरक्षणाच्या बाजूने युक्तिवाद करत असताना दुसरीकडे राज्य लोकसेवा आयोगाने आरक्षण वगळण्यासाठी मागणी केल्याचे दिसले.

 

सरकारला ह्या याचिकेची माहितीच नसल्याचे सरकारकडून सांगण्यात आले. त्यामुळे सरकारमध्ये एकवाक्यता आणि समन्वय नाही की काय असा प्रश्न निर्माण झाला आणि सुप्रीम कोर्टात राज्याची नाचक्की झाली. ह्याविषयी #LawMarathi चा व्हिडिओ रिपोर्ट इथे बघता येईल.

मराठा आरक्षणावर एमपीएससी कडून मोठा घोळ. बघा काय आहे हे प्रकरण  

ह्यानंतर अखेर आता एमपीएससी ने आपली ही याचिका मागे घ्यायचे ठरवले असून आपल्या वकिलांना तसे निर्देशही दिले आहेत, असे समजते.

2 thoughts on “मराठा आरक्षण घोळ – एमपीएससी सुप्रीम कोर्टातील याचिका मागे घेणार.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!