सोनू सूद विरूध्द कारवाई चा मार्ग मोकळा. हाय कोर्टाने याचिका फेटाळली
 

अभिनेता सोनू सूद ह्याने मुंबई महापालिकेविरुद्ध केलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली असून आता त्याच्या अवैध बांधकामावर कारवाई करण्याचा मार्ग BMC साठी मोकळा झाला आहे.

 

लॉकडाऊन च्या काळात स्वखर्चाने अनेक परप्रांतीय कामगारांना त्यांच्या गावी परत पाठवल्याने सोनू सूद चर्चेत आला होता.

 

त्यानंतर त्याच्याविरोधात अवैध बांधकाम केल्यामुळे BMC ने नोटीस काढली होती. शक्ती सागर नावाच्या इमारतीत अवैध सुधारणा करून सूद ह्याने तेथे विनापरवाना हॉटेल सुरू केले होते. ह्यावरून BMC ने त्याच्याविरुद्ध कारवाई ला सुरुवात केली होती. आपण असे काहीही अवैध केले नसून आपले बांधकाम कायदेशीर आहे असे सोनू सूद चे म्हणणे होते. BMC ची नोटीस रद्द व्हावी ह्यासाठी सूद ने हाय कोर्टात याचिका दाखल केली होती. त्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान कोर्टाने सूद ह्याला अंतरिम संरक्षण देत त्याच्या विरोधात कारवाई होऊ नये असे निर्देश दिले होते. परंतु कोर्टाने आता सूद ची याचिका फेटाळली असल्याने हे अंतरिम संरक्षण देखील रद्द झाले आहे.

 

आता BMC सोनू सूद च्या अवैध बांधकामांविरुद्ध कधी आणि काय कारवाई करणार हे बघणे उत्सुकतेचे असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!