‘ तांडव ‘ च्या अली अब्बास जफर ह्यांना हाय कोर्टाकडून संरक्षण
 

धार्मिक तेढ वाढवण्याच्या आरोपांमुळे चर्चेत असलेल्या Amazon Prime वरील तांडव ह्या वेब सीरिज च्या दिग्दर्शकांना मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व संरक्षण दिले आहे.

 

आली अब्बास जफर आणि Amazon च्या अपूर्वा पुरोहित यांच्याविरोधात उत्तर प्रदेशात FIR दाखल झाल्याचे वृत्त सोशल मीडिया वर प्रसिद्ध झाले होते. त्यामुळे ह्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाने ह्या दोघांनी ३ आठवड्यांसाठी Transit Anticipatory Bail देऊन अटक होण्यापासून संरक्षण दिले आहे.

 

Transit Anticipatory Bail अशा वेळी दिली जाते जेव्हा गुन्हा जिथे घडला ती जागा सोडून दुसऱ्याच कुठल्यातरी ठिकाणी फिर्याद दाखल झालेली असते. ह्या प्रकरणात मुंबईतील गुन्ह्यासाठी उत्तर प्रदेशात फिर्याद दाखल झाली आहे. त्यामुळे तेथे जाऊन अटकपूर्व जामीन मिळेपर्यंत अटक होऊ नये ह्यासाठी आरोपींनी मुंबईत ही transit anticipatory bail मागितली होती.

 

उत्तर प्रदेश पोलिस तांडव वर कारवाई साठी मुंबईकडे निघाले असल्याची बातमी ह्यापूर्वी #LawMarathi ने दिली होती.

‘ तांडव ‘ विरोधात कारवाई साठी उत्तर प्रदेश पोलिस मुंबईला रवाना

ह्या कारवाई पासून संरक्षणासाठी अशी Transit Anticipatory Bail कोर्टाने दिली असावी असा अंदाज आहे.

One thought on “‘ तांडव ‘ च्या अली अब्बास जफर ह्यांना हाय कोर्टाकडून संरक्षण

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!