‘ तांडव ‘ विरुद्ध मुंबईतही FIR
 

उत्तर प्रदेश नंतर आता मुंबईत घाटकोपर पोलिस स्टेशन मध्येही ॲमेझॉन प्राईम वारील तांडव ह्या वेब सीरिज विरुद्ध FIR दाखल करण्यात आल्याचे समजते.

 

तांडव मधील काही दृश्ये हिंदू धर्माच्या देवतांचा अपमान करणारी असल्याचे आरोप अनेक लोकांकडून करण्यात येत होते. अनेकांनी ह्या मालीकेविरुद्ध तक्रारी दाखल केल्या होत्या. उत्तर प्रदेश पोलिसांनी मालिकेच्या निर्मात्यांविरोधात यापूर्वीच FIR दाखल केली होती.

‘ तांडव ‘ विरोधात कारवाई साठी उत्तर प्रदेश पोलिस मुंबईला रवाना

माहिती व प्रसारण मंत्रालयाने सीरिज वर होत असलेल्या आरोपांची दखल घेत निर्मात्यांकडून स्पष्टीकरण मागितले होते.

‘तांडव’मुळे अमेझॉनची केंद्र सरकारकडून हजेरी
 

महाराष्ट्र पोलीस ह्या विषयात काय कारवाई करणार ह्याबद्दल प्रश्न उपस्थित होत असतानाच अखेर घाटकोपर पोलिस स्टेशन मध्ये ही FIR दाखल करण्यात आली आहे. तांडव चे निर्माते आणि कलाकारांविरोधात IPC म्हणजेच भारतीय दंड संहितेच्या कलम १५३ अ, २९५ अ, ५०५(२) अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. धार्मिक तेढ निर्माण करणे, एखाद्या धर्माचा अपमान करणे, जाणीवपूर्वक धार्मिक भावना दुखावणारे वक्तव्ये करणे अशा स्वरूपाचे गुन्हे ह्या कलमांमध्ये आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!