२०१८ मध्ये हैद्राबाद मधील एका मदरश्यातून एक १२ वर्षीय मुलगा गायब झाला होता. पोलिसांनी एका २० वर्षीय युवकाचा मृतदेह हा ह्या १२ वर्षाच्या मुलाचा मृतदेह असल्याचे दाखवून ती केस गुंडाळून टाकली होती.
त्या अल्पवयीन मुलाच्या आईने तेलंगणा हाय कोर्टात याचिका दाखल करून आपला मुलगा आपल्याला परत मिळावा अशी मागणी केली होती. परंतु हा मुलगा मृत असल्याचे पोलिसांनी दाखवल्यामुळे कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली होती.
त्यामुळे ह्या अल्पवयीन मुलाच्या आईने आता सुप्रीम कोर्टात याचिका करून ह्या case ची चौकशी सीबीआय ( Central Bureau of Investigation ) कडे सोपवावी अशी मागणी केली आहे.
पोलिसांनी दाखल केलेला फॉरेन्सिक रिपोर्ट आणि पोस्ट मोर्टेम रिपोर्ट ह्यात तफावत असून पोलिसांना सापडलेला मृतदेह आपल्या मुलाचा नाही असे ह्या महिलेचे म्हणणे आहे. पोलिसांनी खोटा रिपोर्ट दाखल केला आहे आणि तेलंगणा हाय कोर्टाने देखील खोट्या रिपोर्ट च्या आधारेच आपला मुलगा मृत झाल्याचे गृहीत धरले असे त्यांचे म्हणणे आहे.
सुप्रीम कोर्टाने ही याचिका दाखल करून घेऊन त्यात तेलंगणा सरकार, गृह खाते आणि पोलिसांना नोटीस बजावली आहे.
One thought on “मदरश्यातून गायब झालेल्या मुलाची आई सुप्रीम कोर्टात”