केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने एका notification द्वारे अशी घोषणा केली आहे की नेताजी सुभाषचंद्र बोस ह्यांची जयंती दर वर्षी ' पराक्रम दिवस ' म्हणून साजरी होईल.
ह्या वर्षी २३ जानेवारी ला नेताजींची १२५ वी जयंती आहे आणि ह्याच निमित्ताने सरकारकडून ही घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे आता दर वर्षी देशात २३ जानेवारी हा दिवस ' पराक्रम दिवस ' म्हणून साजरा होणार आहे.

प्रतिकूल परिस्थितीचा धैर्याने सामना करणाऱ्या नेताजी बोस ह्यांच्याकडून देशवासीयांना आणि विशेष करून तरुणांना प्रेरणा मिळावी आणि देशभक्तीची भावना वाढीस लागावी ह्या हेतूने हा निर्णय घेतल्याचे सरकार ने स्पष्ट केले आहे.
सुभाषचंद्र बोस हे पराक्रमी आणि देशभक्त स्वातंत्र्य सेनानी होते. त्यांनी आझाद हिंद सेनेचे नेतृत्व करत ब्रिटिशांशी लढा दिला होता आणि देशासाठी लढतानाच त्यांचा एका विमान दुर्घटनेत मृत्य झाला होता. त्यांची जयंती सरकारतर्फे दरवर्षी पराक्रम दिवस म्हणून साजरी करण्याचा हा निर्णय कौतुकास्पद असल्याचे बोलले जात आहे