‘ तांडव ‘ विरोधात कारवाई साठी उत्तर प्रदेश पोलिस मुंबईला रवाना

अमेझॉन प्राईम च्या ' तांडव ' ह्या वेब सीरिज विरुद्ध कारवाई करण्यासाठी उत्तर प्रदेश पोलिसांचा एक जत्था मुंबई ला येण्यासाठी रवाना झाल्याचे समजते आहे.

उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे ह्या series मधील हिंदू देवतांच्या अपमानामुळे व्यथित झाले असून त्यांच्या आदेशावरून ह्या सीरिज च्या निर्मात्यांविरुद्ध FIR दाखल झाल्याचे समजते.

योगी आदित्यनाथ ह्यांचे माध्यम सल्लागार शलभमणी त्रिपाठी ह्यांनी आपल्या एका ट्विट द्वारे ही माहिती दिली आहे.

तांडव ह्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या सीरिज मध्ये हिंदू देवतांविषयी आक्षेपार्ह गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत असा आरोप होत आहे. ह्याविषयी केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ह्या सीरिज च्या निर्मात्यांना स्पष्टीकरण देण्यासाठी हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.

 तसेच महाराष्ट्रात भाजप चे नेते राम कदम ह्यांनी ह्या मालिकेविरुद्ध तक्रार दाखल केली होती. दिल्लीतील भाजप नेते कपिल मिश्रा ह्यांनी देखील तांडव मालिका अमेझॉन प्राईम वरुन तात्काळ हटवावी ह्यासाठी amazon prime ला नोटीस पाठवली आहे.

ह्या सगळ्या आरोपांनंतर आता तांडव मालिकेचे दिग्दर्शक अली अब्बास जफर ह्यांनी ट्विटर वरून जाहीर माफी मागितली आहे.

ह्या माफिनाम्यामुळे तांडव वरील कारवाई टळेल अशी शक्यता मात्र कमी आहे.

2 thoughts on “‘ तांडव ‘ विरोधात कारवाई साठी उत्तर प्रदेश पोलिस मुंबईला रवाना

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!